आरोग्य संगोपन जबाबदारी

मुकुल माधव फाऊंडेशन त्यांच्या सामाजिक कार्य विभागामार्फत पुण्यातील अनेक रुग्णालयांशी संबंधित आहे,  फिनोलेक्स इंडस्ट्रीजने यातील अनेक हॉस्पिटलची आधारभूत संरचना पुरवून मदत केली आहे.

 

याव्यतिरिक्त, एक आरोग्यपूर्ण जीवनशैलीविषयी जनजागृती करण्यासाठी एमएमएफने ऑक्टोबर 2013 मध्ये प्रशांति कॅन्सर केअर मिशनने आयोजित केलेल्या भाग पुणे भाग – मॅरेथॉन कार्यक्रमा ला प्रायोजित केल होत.

 

मुलांसाठी मोफत वैद्यकीय शिबीर

 

2008 पासून एमएमएफ रत्नागिरी आणि आसपासच्या शासकीय शाळांमध्ये विनामूल्य द्वि-वार्षिक वैद्यकीय आरोग्य कॅम्प आयोजित करत आहे.  प्रत्येक कॅम्पमध्ये, दंतवैद्य, नेत्र आणि सर्वसाधारण चिकित्सक सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांची तपासणी करतात. केईएम, हॉस्पिटल पुणे, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ ऑडियोलॉजी, भारती विद्यापीठ डेंटल कॉलेज आणि एच. व्ही. देसाई हॉस्पिटल अशा प्रमुख रुग्णालयातील डॉक्टर आणि तज्ञ या शिबिरामध्ये सहभागी होतात.  विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी वैद्यकीय कार्डांचे व्यवस्थापन केले जाते.  ज्यांना आवश्यकता आहे त्यांना एमएमएफ पुढील वैद्यकीय उपचार प्रदान करते.

 

2013 पासून, हा प्रकल्प फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड द्वारे समर्थीत आहे.

 

फेब्रुवारी 2014 मध्ये, पुणे येथील झोपडपट्टीतील मुलांसाठी आणि पंचगनीतील महापालिका शाळांमधील मुलांसाठी एमएमएफ आणि एफआयएल यांनी मुलांसाठी आशा आरोग्य-शिबिरांचे आयोजन केले.

 

स्तन आणि सर्व्हायकल कर्करोग जागरुकता

 

स्तन आणि सर्व्हायकल कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी, ‘एमएएमएफआणि एफआयएलने पुण्यातील प्रशांती कॅन्सर केअर मिशन या एका प्रसिद्ध स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने आपल्या डोअरस्टेप येथे कॅन्सर रोग निदान नावाचा एक अद्वितीय कार्यक्रम आयोजित केला.  डिसेंबर 2013 मध्ये रत्नागिरीतील ग्रामीण महिलांसाठी आणि मार्च 2014 मध्ये पुण्यातल्या झोपडपट्टीत राहणा-या महिलांसाठी हे शिबिर घेण्यात आले.

 

दोन कर्करोग शोधण्याच्या तपासण्या योग्य डॉक्टर, एक सल्लागार आणि प्रशिक्षित तंत्रज्ञ यांच्या निरीक्षणाखाली करण्यात आल्या.  सर्व आवश्यक यंत्रसामग्रीसह सुसज्ज असलेल्या मोबाईल व्हॅनचा उपयोग या उपक्रमासाठी केला.  

 

रत्नागिरीतील आमच्या कॅन्सर तपासणी शिबिरानिची उल्लेखनीय यशाने आम्हाला समजून घेण्यास मदत केली की एका विशेष क्लिनिकची आवश्यकता आहे, जे कॅन्सरचे निदान करेल आणि विविध सेवांचे प्रदान करेल.

 

म्हणूनच, त्या क्षेत्रातील महिलांसाठी आरोग्य सेवांचे उन्नतीकरण करण्याच्या दृष्टीकोनातून, मुकूल माधव फाऊंडेशन, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि प्रशांती कॅन्सर केअर मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीच्या पारकर हॉस्पिटलमध्ये फिनोलेक्स विमेन वेल -बिईंग क्लिनिक” या कॅन्सर डायग्नोस्टिक क्लिनिकची स्थापना करण्याचा निर्णय घेतला, येथे मॅमोग्राफी आणि कोलोप्सोकॉपि (Colposcopy) चाचण्या आयोजित केल्या जातात आणि अनुदानित खर्चात त्या पुरविल्या जातात.

 

जून 2014 मध्ये, डॉ. सी. बी. कोप्पिकर यांनी वेलबिइंग क्लिनिकमध्ये केलेल्या “थेरॉपटिक मॅमोप्लास्टी” या प्रथम उपचाराने इतिहास निर्माण केला.

 

वर्षातून दोनदा आम्ही क्लिनिकमध्ये मॅमोग्राफी कॅम्प्स आयोजित करतो, जेथे फिनोलेक्स पाईप्स रत्नागिरीतील सर्व महिलांना सतत आणि अनिवार्य आरोग्य तपासणीचा संदेश देण्यासाठी आणि प्रसार करण्यासाठी 80% खर्च करते.

 

याशिवाय गेल्या तीन वर्षांपासून फिनोलेक्स पाईप्स व मुकुल माधव फाउंडेशनच्या “अवर मॅरॅथॉन फॉर ब्रेस्ट कॅन्सर” मध्ये सहभागी झाले आहेत.

 

रुबी हॉल क्लिनिक, पुणे आणि हीलिंग लिटल हर्ट्स, यूके

 

मुकुल माधव फाऊंडेशन आणि फिनोलेक्स पाईप्स यांनी मार्च 2014 पासून यूकेमधील नोंदणीकृत धर्मादाय संस्था हिलिंग लिटल हर्ट्स (एचएलएच) आणि पुण्यातील ग्रँट मेडिकल फाऊंडेशनच्या रुबी हॉल क्लिनिक यांच्याबरोबर, त्रैमासिक बालरोग आणि हृदय चिकित्सा शिबिर आयोजित करण्यासाठी, एका  प्रकल्पाची सुरुवात केली.  एकत्रितपणे आम्ही गुंतागुंतीच्या हृदयाच्या प्रक्रिये दरम्यान रुबी हॉल क्लिनिकमधील इन-हाउस डॉक्टरांना स्टँड-इन, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यासाठी यूकेहून विशेष वैद्यकीय पथके पुण्याला आणतो. या चमूमध्ये लीसेस्टरच्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स, अल्ल्डर हे बालसंस्थेचे हॉस्पिटल, लिव्हरपूल चिल्ड्रेन्स हॉस्पिटल आणि इतर संस्थामधील बालरोगतज्ञ, परिचारिका आणि गंभीरपणे आजारी असलेल्या रुग्णांना विशेष काळजी घेणारे डॉक्टर्स यांचा समावेश आहे.  या कार्यक्रमात सहभाग घेणारे डॉक्टर्स हीलिंग लिटल हर्ट्स, लीसेस्टर, यूकेचे संस्थापक डॉ. संजीव निचाणी, यांच्या कडे नोंदणी करतात.

 

सध्या, भारतातील हृदयरोगाच्या समस्या असलेल्या मुलांना आवश्यक असलेल्या शस्त्रक्रिया उपलब्द नसतात किंवा डॉक्टरांकडे त्यांच्यावरील ऑपरेशन्स (कमी वजन असलेल्या बाळंसारख्या) किंवा शस्त्रक्रियेनंतर त्यांची काळजी घेण्याची क्षमता नसते.  ज्यामुळे मृत्युच प्रमाण उच्च होत॰ या प्रकल्पाचा दृष्टीकोन भारतातील या परिस्थितीस मदत करणे हा आहे.

 

हीलिंग लिट्ल हर्ट्सचे सभासद कोणत्याही योग्य आर्थिक मोबदल्याशिवाय या योग्य कारणाच्या समर्थनासाठी भारतात येतात.  हे सर्जन, नवजात मुलांच्या हृदयरोगाशी निगडीत असलेल्या शस्त्रक्रिया करण्यात निष्णात असतात तसेच परिचारिका आणि अतिदक्षता घेणारे डॉक्टर्स यांची टीम शस्त्रक्रिये  पश्चात काळजी घेण्यात कुशल असते.

 

मुकूल माधव फाऊंडेशनच्या माध्यमातून फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडने या टिम च्या निवास व घरगुती प्रवास खर्चास प्रायोजित केले आहे आणि पुण्यातील इतर इस्पितळांसोबत संभाव्य टाय अप करण्यास पहात आहे. आम्ही मझादा कलर्स लि. च्या अमित आणि प्रीती चोकसी यांच्याकडून त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी प्रायोजकत्व मिळविण्यासाठी भाग्यवान आहोत.

 

मे 2016 मध्ये, या उपक्रमाचा 100 मुलांना फायदा झाला असेल!

 

आरोग्य कॅम्प

 

आम्ही नियमितपणे आमचे कारखाने आणि कार्यालयांमधील आमच्या सर्व कर्मचा-यांसाठी वैद्यकीय शिबीरे आयोजित करतो.

 

 

 

 

 

 

गॅलरी

चौकशी-साठी विचारा

कोणत्याही चौकशी चौकशीसाठी

18002003466

चौकशी फॉर्म

खाली तपशील भरा आणि आमच्या अधिकाऱ्यांपैकी एक लवकरच आपल्याकडे परत येईल.