सस्टेनेबिलिटी (निरंतरता)

आम्ही एक कंपनी आहे आणि आम्ही व्यवसाय कसा करतो याचा सस्टेनेबिलिटी हा एक अविभाज्य भाग आहे. हे फक्त आम्ही तयार केलेली उत्पादनेच नाही; तर पर्यावरण, सामाजिक उत्तरदायित्व आणि शासन या सामान्यतः स्वीकृत तत्त्वांसह आमचे एकीकरण आहे. फिनोलेक्स ऊर्जा आणि संसाधन संवर्धनाकडे अधिक लक्ष देते. ती ऊर्जा बचत किंवा ऑप्टिमायझेशन असो, आम्ही स्थिरतेच्या एकूण उद्दीष्टाच्या दिशेने काम करीत राहू. आमचा दृष्टीकोन, पूर्वी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर, विविध पुरस्कारांच्या माध्यमातून, अधिकृत मान्यताप्राप्त झाला आहे.

 

अलीकडील अधिकृत मान्यता

सर्वोत्कृष्ट सुरक्षा पद्धती पुरस्कार 2015 – राष्ट्रीय सुरक्षा परिषद

ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स अवार्ड 2014: बिलिव्हर्स श्रेणी मेरिटचे प्रमाणपत्र, फ्रॉस्ट अँड सुलिवन कडून.  

वॉटर कंपनी ऑफ द इयर अवार्ड नॅशनल सीएसआर लीडरशीप कॉंग्रेस अँड अॅवॉर्ड्स कडून.

ब्ल्यूएडार्ट ग्लोबल सीएसआर एक्सलन्स अँड लीडरशीप अवार्ड  “समर्थन आणि शिक्षणाच्या गुणवत्ता सुधार” या साठी”

 

पर्यावरण

फिनोलेक्समध्ये, पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी आम्ही त्याचा आदर करतो, संरक्षण करतो आणि प्रयत्न करतो. पर्यावरण संरक्षण हे आमच्या सर्व कृतींचा अविभाज्य भाग आहे. व्यवस्थापकाद्वारे पुनरावलोकन केलेल्या नियमित ऑडिटच्या माध्यमातून सर्व साइट्सवर पर्यावरण मापदंडांचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी पर्यावरण व्यवस्थापन सेल कार्यरत आहे. आमचा रत्नागिरी प्लांट आयएसओ 14001: 2015 टीयूव्ही, जर्मनीद्वारे प्रमाणित आहे, आणि इतर सर्व प्लांट्स साठी तत्सम मार्गदर्शकतत्त्वे कार्यरत आहेत. आमचे पॉलिमर उत्पादन धातूंच्या गरजांची जागा घेते, पृष्ठभागाची गळतीपासून रक्षण करते आणि स्वच्छ गंजमुक्त, ऊर्जा कार्यक्षम व टिकाऊ जलप्रवाह प्रणाली प्रदान करते.

 

प्रदूषण नियंत्रण

आमचा पीव्हीसी रेझिन प्लांट संगणक नियंत्रण असलेल्या बंद प्रणालीमध्ये कार्य करतो. उपचार न केलेले अनियंत्रित उत्सर्जन वातावरणात सोडल जात नाही. प्रतिष्ठित स्वतंत्र संस्थांकडून स्टॅक गॅसेस आणि चिमणीच्या व्हेंटचे नियमितपणे परीक्षण केले जाते. पॉवर प्लांट मधील फ्ल्यू गॅस, स्टॅक तसेच अॅक्विअस एफ्लुअंट थेट राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ सर्व्हरशी कनेक्ट केलेल्या ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टमसह सुसज्ज आहे. राष्ट्रीय मानका नुसार वातावरणातिल हवेची गुणवत्ता नियंत्रित केली जाते. वेगवेगळ्या ठिकाणांच्या हवाचे नमुने वर्षभर संपूर्णपणे उत्तम पद्धतीने गोळा केले जातात.

 

वॉटर हार्वेस्टिंग (पाण्याची साठवण)

 

डॅम्स (बांध)

फिनोलेक्सने आपल्या रत्नागिरी प्रकल्पापासून 7 किलोमीटर दूर थोरली नदीवर बांध बांधला आहे. या धरणाने समुद्रात व्हावून जाणार पावसाच पाणी वाचवल आहे. यामुळे आसपासच्या परिसरातील भूजल पातळी वाढविण्यास मदत झाली आहे.

 

रेन वॉटर हार्वेस्टिंग (पावसाच्या पाण्याची साठवण)

फिनोलेक्सने रत्नागिरीतील आमच्या प्लांटमध्ये प्रत्येकी 3.0 लाख क्यूबिक मीटर क्षमतेचे व जिओमेम्ब्रेन चा पृष्ठभाग असलेले दोन मोठे जलाशय बांधले आहेत. हे जलाशय नैसर्गिक भूभाग वापरून पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त साठा करण्यास मदत करतात.

 

एफ्लूएंट रिसयकलिंग (सांडपाणी पुनर्वापर)

रत्नागिरी येथे दररोज बाहेर पडणार्‍या 3000 क्युबिक मीटर एफ्लुअंट च्या जवळ जवळ 50% एफ्लुअंटच शुद्धीकरण करून बॉयलर फीड वॉटरची गुणवत्ता असलेल पाणी पुन: प्लांट मध्ये वापरल  जात.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या नियमांची पूर्तता करण्यासाठी उर्वरीत सांडपाण्यावर प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीयक उपचार सुविधां असलेल्या आमच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या एफ्लुअंट ट्रीटमेंट  प्लांट मध्ये पूर्णपणे उपचार केले जातात. नंतर उपचारित पाणी आमच्या प्लांटच्या परिसरातिल 150 एकर पर्यंत पसरलेल्या ग्रीन कॉरीडोर मध्ये लागवडीस सिंचन करण्यासाठी वापरले जाते

फिनोलेक्सने त्याच्या सुविधामध्ये शून्य प्रवाहयुक्त एफ्लुअंटचे तत्त्व स्वीकारले आहे.उपचार न केलेलं एफ्लुअंट आमच्या प्लांट च्या बाहेर सोडलं जाणार नाही याची आम्ही खात्री करतो. सतत चोवीस तास प्लांट मध्ये दक्षता तपासणी द्वारे बारकाईने देखरेख केली जाते. 

 

ग्रीन बेल्ट (हरितपट्टा)

1990 पूर्वी प्लांट साईट येथे असलेली एक जुनी नापीक जमीन आज हरितपट्ट्या मध्ये बदलली आहे. आंबा, काजू, नारळ, बाभूळ आणि अशाच प्रकारच्या विविध प्रजातींमधील 50,000 हून अधिक झाडांची लागवड 150 एकर पसरलेल्या क्षेत्रात केली आहे.

 

घनकचरा व्यवस्थापन

त्यांच्या प्लांट मध्ये जागतिक दर्जाचे घनकचरा व्यवस्थापन पद्धती साठी फिनोलेक्स वचनबद्ध आहे. तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंटमध्ये सर्व घातक कचरा अधिकृत घातक टाकावू पदार्थ विल्हेवाटीच्या सुविधेद्वारे निकाली काढले जातात. इलेक्ट्रॉनिक कचरा इको रिसाइक्लिंग लिमिटेड, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मंजूर केलेल्या सुविधेद्वारे द्वारे निकाली काढला जातो.

कंपोस्टबल कँटीन कचर्‍यावर अन्नाचा कचरा सेंद्रीय खतात परिवर्तित करनार्‍य यंत्रांद्वारे प्रक्रिया केली जाते. हिरवा कचरा चुराडा करून गोळ्या मध्ये रूपांतरित करून आमच्या उपाहारगृहा मध्ये इंधन म्हणून वापरला जातो. 

आम्ही धोरण म्हणून प्लास्टिक कचरा तयार करणे कमी करतो. सर्व प्लॅस्टिक कचरा पूर्णतः वेगळा करून पुनर्प्रक्रिया केली जाते. 

 

ध्वनी प्रदूषण

प्लांट्स हे सुनिश्चित करतात की संबंधित राज्य प्राधिकारणानी दिलेल्या स्तरांमध्ये आवाजाची पातळी कायम राखली जाते. प्लांट्स मधील विविध ठिकाणी ध्वनींचे परीक्षण केले जाते. कॉम्प्र्रेसर आणि ब्लोअर हाऊससारख्या उच्च आवाजाच्या क्षेत्रामध्ये, एचएसई मार्गदर्शक तत्त्वे काना चे संरक्षण (कानचे मफ आणि कानचे प्लग) एक अनिवार्य आवश्यकता म्हणून सुनिश्चित करतात.

 

ऊर्जा बचत आणि इतर पुढाकार

कच्चा माल आणि रसायनांचा वापराचे अतिशय लक्षपूर्वक परीक्षण केले जाते आणि तोटा कमीत कमी ठेवला जातो. फिनोलेक्सचा वापर हा जागतिक स्तरावर समान उद्योगांच्या बेंचमार्क शी तुलनात्मक आहे.

वीज बचत करण्यासाठी आपल्या लाईटिंग्स एलईडने बदलण्याबरोबरच ऊर्जेच्या नूतनीकरण निर्मितीसाठी सौर पॅनेल स्थापित करण्याची शक्यता शोधून काढण्यासाठी आम्ही एक उपक्रम सुरू केला आहे.

 

आरोग्य

फिनोलेक्समध्ये कर्मचा-यांचे आरोग्य आणि कुशलतेला सर्वाधिक महत्त्व आहे. हा प्रवास सर्व नवीन रुजू होणार्‍या कर्मचा-यांच्या पूर्व-रोजगार वैद्यकीय तपासणीपासून सुरू होतो ज्यात सामान्य परीक्षा, हिमोग्राम, यकृत कार्य चाचणी, रक्तातील साखर स्तर निरीक्षण, इत्यादींचा समावेश असतो.

आम्ही सहसा कर्मचा-यांचे स्वास्थ्य व्यवस्थापन करण्यासाठी वार्षिक कॅलेंडरचे पालन करतो. अलिकडच्या निदान चाचण्या कर्मचार्यांच्या प्रोफाईलवर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपलब्ध आहेत. आमच्या व्यावसायिक आरोग्य केंद्रात स्वास्थ्याचा मागोवा घेतला जातो. रत्नागिरी केंद्रामध्ये अॅम्बुलन्स, 6 बेड आणि प्रशिक्षित पुरुष नर्सची चोवीस तास सुविधा उपलब्ध आहे. डॉक्टर चोवीस तास उपलब्ध आहेत.

 

फायर सेफ्टी

आणीबाणीच्या तयारीसाठी, मॉक ड्रिलर्स आणि फायर ड्रीलस नियमितपणे केले जातात. फिनोलेक्स फायर ऍन्ड सिक्युरिटी डिपार्टमेंटमध्ये फायरफाइटिंगची अत्याधुनिक उपकरण आणि वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरण उपलब्ध आहेत. सोप्या सुलभते साठी मॅन्युअल कॉल पॉइंट्स (एमसीपी) भिन्न झोनमध्ये स्थित आहेत. कोणत्याही संभाव्यतेची काळजी घेण्यासाठी तीन पूर्णतः सुसज्ज अग्निशामक उपलब्ध आहेत. प्रेशराइ्जड फायर वॉटर नेटवर्क आमच्या परिसरात सर्वत्र पसरले आहे. नियोजन करण्यासाठी उपयुक्त फायर वॉटर पंप्स उपलब्ध आहेत आणि प्रेशर ड्रॉप वर आधारित क्रमा क्रमाने सुरु होतात. ऑनसाइट इमर्जन्सी मॅनेजमेंट प्लॅनचा नियमित वापर केला जातो. 

 

रोजगार

आम्ही सर्वसमावेशक वाढ आणि फिनोलेक्समध्ये विश्वास ठेवतो, याचा अर्थ आसपासच्या परिसरात राहणारे समुदाय वाढतात आणि समृद्ध होतात. आमच्या रत्नागिरी येथील 600+ कर्मचा-यांचे   कारखान्यात 70% कर्मचारी रत्नागिरी जिल्हा आणि कोकण क्षेत्रातिल आहेत.

आमच्या कार्याला सकारात्मक प्रतिसाद म्हणून खूप अप्रत्यक्ष रोजगाराला निर्माण केले जाते जे  आजूबाजूच्या सर्वसाधारण समृद्धीला कारणीभूत ठरते.

 

कौशल्य विकास

देशातील दुसरे सर्वात मोठे पीव्हीसी उत्पादन संयंत्र सुरक्षा आणि कार्यक्षमते सह चालविण्यासाठी कार्यक्षम आणि सक्षम कर्मचा-यांची आवश्यक्यता आहे. म्हणूनच फिनोलेक्सला हे अत्यंत महत्त्वाचे आहे की त्यांचं मनुष्यबळ शिक्षित आणि सक्षम असल पाहिजे. हे सुनिश्चित करण्यासाठी, आम्ही प्रमुख तांत्रिक क्षमतेतील त्रुटि शोधून अंतर्गत / बाह्य प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे योग्य प्रशिक्षण इनपुटसह त्या भरून काढतो.

 

सीएसआर

आमचे सीएसआर उपक्रम शिक्षण, आरोग्य, समुदाय विकास आणि पाणी पुरवठा यावर केंद्रित आहेत. फिनोलेक्स रत्नागिरीत  अभियांत्रिकी महाविद्यालय आणि प्लांट साइटच्या जवळ इंग्रजी माध्यम विद्यालय चालविते. आम्ही आर्थिक सहाय्याद्वारे जवळपासच्या शाळांना मदत करतो.

आमच्या सुविधा आणि त्यांच्या आसपास मूलभूत आरोग्य सेवेचा प्रचार करण्यासाठी, आम्ही आरोग्य कॅम्प्स आयोजित करतो, मॅमोग्राफी केंद्र चालतो, सेरेब्रल पाल्सीसाठी फिजिओथेरेपी सेंटर इ. आसपासच्या गावांसाठी विविध सामाजिक विकास योजना राबविण्यात आल्या आहेत जसे की, स्त्रियांसाठी कौशल्य विकास, मंदिरे बांधण्यासाठी देणग्या इ. आम्ही राष्ट्रीय ग्रामीण पेय जल योजनेला मदत करतो आणि आमच्या शेजारच्या भागात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतो.

 

शासन

आमचे कॉरपोरेट गव्हर्नन्स आमच्या मूल्य प्रणालीचे प्रतिबिंब आहे ज्यात आपली संस्कृती, धोरणे आणि आमच्या भागधारकांबरोबरचे संबंध आहेत. आम्ही आमच्या भागधारकांचा विश्वास नेहमीच प्राप्त करून ठेवतो याची खात्री करण्यासाठी निष्ठा आणि पारदर्शकता आमच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स पद्धतींचा मुख्य भाग आहे. 

आमचे कॉरपोरेट गव्हर्नन्स फ्रेमवर्क हे सुनिश्चित करते की आम्ही वेळेवर प्रकटीकरण करतो आणि आमच्या वित्तीय आणि कार्यप्रदर्शनासंदर्भात अचूक माहिती शेअर करतो, तसेच फिनोलेक्सच्या नेतृत्व आणि प्रशासनाशी संबंधित माहिती प्रकाशित करतो. आमचा असा विश्वास आहे की कॉर्पोरेट प्रशासनच्या उच्चतम दर्जाची खात्री करण्यासाठी एक सक्रिय, सुविख्यात आणि स्वतंत्र बोर्ड आवश्यक आहे. फिनोलेक्समध्ये, नियामक मंडळ आमच्या कॉपोर्रेट गव्हर्नन्स प्रॅक्टिसचा गाभा आहे. बोर्ड व्यवस्थापनाच्या कार्यावर देखरेख करते आणि आमच्या भागधारकांचे दीर्घकालीन हितांचे रक्षण करते.

चौकशी-साठी विचारा

कोणत्याही चौकशी चौकशीसाठी

18002003466

चौकशी फॉर्म

खाली तपशील भरा आणि आमच्या अधिकाऱ्यांपैकी एक लवकरच आपल्याकडे परत येईल.